प्रतिनिधी
पुण्यातील दोन मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेचा एकमेकांना पाठिंबा मिळाल्याने मनसेचे कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे आणि राष्ट्रवादीच्या पर्वती मतदार संघातील उमेदवार अश्विनी कदम यांचा मार्ग सुकर झाला आहे.
गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या चंद्रकांत पाटलांना आव्हान देण्यासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. किशोर शिंदे यांनी गेल्या वेळी चांगली फाईट दिली होती. आता राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाल्याने किशोर शिंदे यांना आणखी बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादीने कोथरूडमध्ये पाठिंबा दिल्यानंतर मनसेने देखील त्याची परतफेड लगेच करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वती मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघातून कदम यांचे पारडे आणखी जड झाले आहे. त्यामुळे
भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या समोर कदम यांचे तगडे आव्हान आहे.