
प्रतिनिधी
शुक्रवार दि.१७/११/२०२४ रोजी,महाविकास आघाडी मित्र पक्षाचे पुणे केंटोमेन्ट विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.रमेशदादा बागवे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे नगरसेविका पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ताडीवाला रोड भागात SRA स्कीम सोसायटी (पानमळा),मुकुंद हौसिंग सोसायटी,तसेच कुमार पिण्याकल सोसायटी,तुषार हौसिंग सोसायटी, आकाशगंगा सोसायटी,येथे मतदार बंधू भगिनींना प्रचार पत्र वाटली.
तसेच आज शुक्रवार (जुम्मा) असल्याने भागातील एकमेव इन-आम मस्जिद जवळ नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना प्रचार पत्रके वाटली आणि पंजा समोरील बटन दाबून मा.बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असा आग्रह केला.
या वेळी मा.नगरसेविका श्रीमती लताताई राजगुरू, माजी स्वीकृत सदस्य किशोर भाई वाघेला, काँग्रेस कार्यकर्ते सौ.सुविधाताई त्रिभुवन, शहर काँग्रेस चिटणीस जमसुभाई शेख, शहर काँग्रेस सरचिटणीस सौ.मीराताई शिंदे वार्डअध्यक्ष अँथनी वाकडे. राकेश भाऊ त्रिभुवन युवक काँग्रेसचे सरचिटणीस सचिनभाऊ सुडगे,महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सचिव असिफ भाई खान, काँग्रेस कार्यकर्ते संदीप शिंदे सुरज कानडे कैलास झेंडे ईश्वर भंडारी बंडू कामाठे आदित्य चौरे आदी सर्वजण उपस्थित होते.